web-ads-yml-728x90

Breaking News

ग्रामीण भागाच्या विकासास प्राधान्य देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – औरंगाबाद

ग्रामीण भागावर अधिक लक्ष केंद्रीत करुन जिल्हा नियोजनचा निधी ग्रामीण भागातील विकासासाठी योग्य पद्धतीने खर्च करावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी केली.विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज सन-2021-22 जिल्हा वार्षिक योजना  (सर्वसाधारण) चा प्रारुप आराखडा अंतिम करण्यासाठी श्री.पवार यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद विभागाची बैठक झाली. या बैठकीत औरंगाबाद विभागासाठी 2240 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली.

बैठकीस संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, वित्त व नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त,  जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्याधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, आदींसह विभाग प्रमुख उपस्थित होते.

No comments