web-ads-yml-728x90

Breaking News

राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज जयंती साजरी

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव –  अहमदनगर

नालेगांव,अहमदनगर येथे लहुजी शक्ती सेना व नालेगांव येथील सामाजीक कार्यकर्ते यांच्या संयुक्त विद्दमाने राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांची जयंती साजरी केली. देशाला स्वच्छतेचा वसा देनारे दिन दलीत आणि पिडीतांच्या सेवेमध्ये आपले आयुष्य व्यतीत करणारे, माणसांत देव शोधणारे,थोर समाजसुधारक राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांची जयंती मोठ्या ऊत्साहात साजरी करण्यात आली. पै.दत्ताभाऊ वामन, पिंटुभाऊ चव्हाण व सचीन भाऊ चितळे यांनी गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. महीला पोलीस मनिषा पारधी व पोलीस सुनिल घाने यांनी दिप प्रज्वलन केले. लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाकार्याध्यक्ष सुनिल सकट म्हणाले कि राष्ट्रसंत गाडगे बाबा महाराज यांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश सकल जनतेने आत्मसात करावा व माणसाने माणसांत देव बघुन एकमेकांस मदतीचा हात द्यावा. त्या समयी भिमराव सकट, सुशिलाबाई सकट, कु.पुजा सकट, कु.आरती सकट, कु.प्रसाद सकट,यांनी  अभिवादन केले.

 

No comments