web-ads-yml-728x90

Breaking News

मोदींना अडीच महिने शेतकरी हक्कांसाठी आंदोलन करतायत ते दिसलं नाही’ - नाना पटोले

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चेन्नईच्या दौऱ्यावर आहेत. चेन्नईला पोहोचताना पंतप्रधानांचे हेलिकॉप्टर एम.ए. चिदंबरम स्टेडियमजवळून उडत असताना त्यांनी हवेतूनच भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचे दृश्य टिपले. पीएम मोदींनी आपल्या ट्विटर हँडलवर स्टेडियमचे चित्र लगोलग शेअरही केले. या फोटोत क्रिकेटपटू पांढऱ्या पोशाखात दिसत आहेत. ट्विट करताना पंतप्रधानांनी लिहिले की, त्यांनी या मजेदार सामन्याचे दृश्य आकाशातून पाहिले. मोदींनी हे छायाचित्र आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. गेल्या ८० दिवसांपासून कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे, ते मात्र मोदींना दिसलं नाही अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे.‘प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी अगोदर अडीच महिन्यांपासून देशभरातील शेतकरी दिल्ली च्या सिमेवर आपल्या न्यायिक मागण्या व हक्का साठी बसलेले आहेत… ते तुम्हाला दिसत नाही काय??’ असा थेट सवाल नाना पटोले यांनी केला आहे. महाराष्ट्र काँग्रेसची सूत्रे स्वीकारल्यानंतर नाना पटोले यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे.

 

 

No comments