web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड मध्ये सालाबाद प्रमाणे माघी गणेशोत्सव सोहळा साजरा

 


BY - गौरव शेलार, युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड ,ठाणे

कोरोनाच्या संकटामुळं गेल्या कित्येक महिन्यांपासून किबहुना 2020 या संपूर्ण वर्षभरातच अनेक सणउत्सव साजरा करण्यावर निर्बंध आले. कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी म्हणून अनेक परंपरातही खंडीत झाल्या. या साऱ्याचे परिणाम म्हणजे सध्याच्या घडीला आटोकत्यात आलेला कोरोनाचा प्रसार.एकेकाळी धडकी भरेल अशा वेगानं हा विषाणू राज्यात आणि देशातही फैलावत होता. पण, लॉकडाऊन आणि काही निर्बंधांच्या काटेकोर पालनामुळं अशक्य वाटणाऱ्या या संसर्गावरही नियंत्रण मिळवण्यात आलं. दरम्यानच्या काळात अनेक सार्वजनिक कार्यक्रम, सण- उत्सवांचा जल्लोष रद्द झाला किंवा मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीच हे कार्यक्रम पार पडले. सध्याही परिस्थिती सावरलेली दिसत असली तरीही हे संकट पूर्णपणे टळलेलं नाही. याच पार्श्‍वभुमीवर श्री गणेशाचे आगमन झाल्याने लोकांच्या मनातील कोरोनाची भीत मात्र आता निघुन गेल्याचे दिसते.सालाबाद प्रमाणे लोकांनी यावर्षीही माघी गणेशोत्सवाचा सोहळा साजरा करण्याचा आनंद लुटला मुरबाड मध्ये कोरोना संसर्गाचे नियम अटी पाळून गणेशोत्सव सोहळा साजरा केला.तसेच तमाम जनतेने श्री गणेशाकडे कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे असे साकडे घातले. याच पार्श्‍वभुमीवर श्री गणेशाचे आगमन झाल्याने लोकांच्या मनातील कोरोनाची भीत मात्र आता निघुन गेल्याचे दिसते.सालाबाद प्रमाणे लोकांनी यावर्षीही माघी गणेशोत्सवाचा सोहळा साजरा करण्याचा आनंद लुटला मुरबाड मध्ये कोरोना संसर्गाचे नियम अटी पाळून गणेशोत्सव सोहळा साजरा केला.उल्हासनगर येथे युवा महाराष्ट्र लार्इव्ह टिव्ही न्युज चॅनेलचे सहसंपादक मिलींद दळवी यांच्या घरी सुध्दा सालाबाद प्रमाणे श्री गणेशाचा सोहळा साजरा होत आहे.तसेच तमाम जनतेने श्री गणेशाकडे कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे असे साकडे घातले.

No comments