web-ads-yml-728x90

Breaking News

‘बंगाबंधू’ सिनेमामुळे महाराष्ट्र-बांग्लादेशमधील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होतील – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

बांग्लादेशाचे राष्ट्रपिता श्री. शेख मुजिबुर रेहमान यांच्या जीवनावर आधारित ‘बंगाबंधू’ सिनेमाची निर्मिती करण्यात येत आहे. या सिनेमाचे चित्रीकरण सध्या दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे सुरु असून या सिनेमाच्या निर्मितीमुळे महाराष्ट्र आणि बांग्लादेशमधील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केला.

बांग्लादेशचे माहिती मंत्री डॉ. हसन महमूद यांनी गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीला भेट दिली. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्यासह बांग्लादेशचे शिष्टमंडळ उपस्थित होते. या शिष्टमंडळात बांग्लादेशचे खासदार शाल्मुम सरवर कमाल, बांग्लादेशचे भारतातील उप उच्चायुक्त मु. लुत्फर उपस्थित होते. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एन.के.व्यास, दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक मनीषा वर्मा, सह व्यवस्थापकीय संचालक आंचल गोयल यांच्यासह दादासाहेब फाळके चित्रनगरीचे अधिकारी उपस्थित होते.

 

No comments