0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - चेन्नई

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चेन्नईच्या दौऱ्यावर आहेत. चेन्नईला पोहोचताना पंतप्रधानांचे हेलिकॉप्टर एम.ए. चिदंबरम स्टेडियमजवळून उडत असताना त्यांनी हवेतूनच भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचे दृश्य टिपले. पीएम मोदींनी आपल्या ट्विटर हँडलवर स्टेडियमचे चित्र लगोलग शेअरही केले. या फोटो क्रिकेटपटून पांढऱ्या पोशाखात दिसत आहेत. ट्विट करताना पंतप्रधानांनी लिहिले की, त्यांनी या मजेदार सामन्याचे दृश्य आकाशातून पाहिले. पंतप्रधान मोदी रविवारी तामिळनाडूच्या दौऱ्यावर होते. तेथे त्यांनी राज्यासाठी अनेक विकास प्रकल्पांची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयआयटी मद्रासच्या डिस्कवरी कॅम्पसची पायाभरणी केली. चेन्नईजवळील थियूर येथे हा परिसर तयार केला जाईल. पहिल्या टप्प्यात सुमारे 2 लाख चौरस मीटर क्षेत्रामध्ये या कॅम्पसच्या बांधकामासाठी 1000 कोटी रुपये खर्च येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नईतील मेट्रो रेल फेज -1 विस्ताराचे उद्घाटन केले आणि वॉशरमेनपेट ते विमकोनगरपर्यंत प्रवाशांच्या सेवेस हिरवा झेंडा दाखवला. यासह त्यांनी चेन्नईमध्ये 293.40 कोटी रुपये खर्चून तयार केलेल्या ‘चेन्नई बीच आणि अट्टीपट्टूदरम्यानच्या चौथ्या रेल्वे मार्गाचे उद्घाटन केले.

Post a Comment

 
Top