web-ads-yml-728x90

Breaking News

मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांना करातून १२ टक्के सवलत देण्याचा निर्णय

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - लातूर

नियमितपणे मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांना करातून १२ टक्के सवलत देण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. ५ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसह एकूण ३४ विषयांना या सभेत मंजुरी देण्यात आली. पालिकेच्या इतिहासात दुसऱ्या वेळी झालेली सर्वसाधारण सभा पाच तास चालली. ही सभा यशस्वी ठरल्याची माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली.

    सर्वसाधारण सभेनंतर माहिती देताना महापौर गोजमगुंडे यांनी सांगितले की, जे नागरिक दिनांक २५ मार्च पूर्वी आपला मालमत्ता कर भरतील त्यांना करातून १२ टक्के व व्याजात १०० टक्के सूट दिली जाणार आहे. ज्या नागरिकांनी यापूर्वीच हा कर भरलेला आहे त्यांना देखील पुढील वर्षाच्या करामध्ये या सवलतीचा लाभ देण्यात येईल. पुढील वर्षापासून जून अखेरपर्यंत आगावू कर भरणारे नागरिक हा लाभ घेऊ शकतात. माजी सैनिक व सैनिकांच्या विधवा पत्नींना कर माफिसही यावेळी मंजुरी देण्यात आली. शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या ५ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीस सर्व साधारण सभेने मंजुरी दिली. हा प्रकल्प उभा केल्यास विजेबाबत मनपा स्वयंपूर्ण होणार आहे. त्यासाठी आवश्यक जमीन खरेदीसाठी १ कोटी तसेच महानगरपालिकेचा वाटा म्हणून ४ कोटी रुपयांचा निधी देण्यासही या सभेने मंजुरी दिली.

No comments