0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

उरणच्या एसटी डेपोमध्ये कोकण मराठी सहित्य परिषद उरणच्या कवींचे कविसंमेलन रायगडभूषण प्रा. एल बी पाटील  यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.डेपो व्यवस्थापक सतीश मालचे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून पाहुण्यांचे स्वागत केले.या कार्यक्रमाला डेपो नियंत्रक हरिश्चन्द्र भुंडे,मेंटेनन्स प्रमुख सुनील कोळी, प्रा.किरण  गावंड ,पदमाकर भोईर यांची प्रमुख उपस्थिती होती.अध्यक्षीय भाषणात रायगडभूषण प्रा. एल.बी. म्हणाले की राजभाषा मराठी ही समृद्ध भाषा आहे.तिची समृद्धता वाढवून जतन करण्याची गरज आहे.केंद्र सरकार हे महाराष्ट्र आणि मराठी द्वेष्ठे असल्यामुळे इतक्यात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा ते सरकार देणार नाही .कविसम्मेलनात शाहीर मोरेश्वर म्हात्रे,म. का. म्हात्रे,नाटककार रायगडभूषण किशोर पाटील,भास्कर पाटील,सी.बी.म्हात्रे.संजय होळकर यांनी  मराठी आणि आगरी बोलीतील सुश्राव्य कविता ऐकवून तेथे जमलेल्या प्रवाशांनाही प्रभावित केले. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन मच्छिंद्र म्हात्रे यांनी केले.

Post a comment

 
Top