web-ads-yml-728x90

Breaking News

गुजरातच्या चार शहरांमध्ये पुन्हा नाईट कर्फ्यू

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – अहमदाबाद

कोरोनाची वाढत्या केसेसमुळे 16 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीत गुजरातच्या चार शहरांमध्ये पुन्हा नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या शहरांमध्ये अहमदाबाद, वडोदरा, सुरत आणि राजकोटचा समावेश आहे. तथापि, रात्रीच्या कर्फ्यूची वेळ एक तासाने कमी करण्यात आली आहे, म्हणजेच आता रात्री 12 ते सकाळी 6.00 अशी वेळ कर्फ्यूची असणार आहे. गुजरातेत मागच्या 24 तासांत कोरोनाचे 247 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, राज्यात आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या वाढून 2,65,244 झाली आहे. त्याच वेळी मृतांची संख्या वाढून 4401 झाली. तत्पूर्वी, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. रविवारी वडोदराच्या निजामपुरा भागात आगामी महापालिका निवडणुकांच्या प्रचार सभेला संबोधित करताना विजय रुपाणी स्टेजवर बेशुद्ध झाले आणि त्यानंतर त्यांना अहमदाबाद येथे नेण्यात आले. तेथील यूएन मेहता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

 

 

No comments