web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड तालुक्यात एसआर स्टुडिओची भर नवनवीन कलाकार घडणार

BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

कोरोना काळामध्ये अनेक जणांच्या नोकर्‍या गेल्या अनेक डान्सचालक नृत्य प्रशिक्षक यांना सुध्दा कोरोनाचा फटका बसला मात्र आता कोरोनाचे सर्व बंधने पाळून डान्सचालक नृत्य प्रशिक्षक पुन्हा आपल्या टॅ्रकवर आले असल्याचे उदाहरण मुरबाड मध्ये दिसत आहे.मुरबाडच्या धरतीवर मोठ मोठे कलाकार घडत आहेत.त्याच पार्श्‍वभुमिवर मुरबाड तालुक्यातील डान्सर रोशन हिंदुराव व सन्नी हिंदुराव यांनी मुरबाड तालुक्यात डान्स सोबत आता गायन क्लासेस,तब्बला क्लासेस,फ्लुट क्लासेस,कराटे क्लासेस,पार्टी मिटींग हॉल आता एकाच छताखाली होणार आहे.मुरबाड तालुक्यातील डान्सर रोशन हिंदुराव व सन्नी हिंदुराव या कुशाल तरूणांनी एसआर स्टुडीओची स्थापना करण्याची चांगली युक्ती मांडली असून तालुक्यातील स्थानिक कलाकाराना आता येथे शिकण्याची संधी मिळणार आहे.

यामध्ये गोरगरीब कलावंताना आपली कला दाखवण्यासाठी एसआर स्टुडीओच्या माध्यमातुन आपली ओळख मुरबाड सारख्या तालुक्यातुन महाराष्ट्रात होणार असल्याने तालुक्यातील कलाकारांनी आता या संधीचा सोनं करावे असे यावेळी एसआर स्टुडीओचे रोशन हिंदुराव व सन्नी हिंदुराव यांनी सांगितले. मुरबाड तालुक्यातील कित्येक कुशाल कलावंतानी महाराष्ट्रात आपली कला दाखवुन पुढे जाण्याचा गौरव केला आहे.एसआर स्टुडीओला युवा महाराष्ट्र लाईव्ह टिव्ही न्युज व सा.स्वप्नज्योती टाम्स परिवाराकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा.....!

No comments