BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली
प्रसिद्ध लोकांच्या संबंधित व्यक्तींना प्रसिद्धी सोबत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याच समस्यांचा सामना भारतीय संघाचा माजी कर्णधार व बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या पत्नी डोना यांना करावा लागला. आपल्या नावाने बनावट फेसबुक पेज बनवल्या प्रकरणी डोना यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.सौरव गांगुली याची पत्नी डोना यांनी आपल्या नावे बनावट फेसबुक पेज बनवल्या प्रकरणी अज्ञात इसमा विरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे. डोना यांनी आपल्या तक्रारीत म्हटले, ‘माझ्या नावाचा वापर करून आणि सौरव यांच्यासोबतचे माझे छायाचित्र वापरुन कोणीतरी बनावट फेसबुक पेज तयार केले आहे. माझ्या एका विद्यार्थ्यीनीने मला याबाबत सांगितले. आम्हा दोघांचे छायाचित्र वापरले गेले याविषयी काही प्रश्न नाही. मात्र, काही वेळा लोक टिप्पण्या करणे सुरू करतात. यामुळे गैरसमज निर्माण होतात. मला आशा आहे की, पोलीस हे प्रकरण मिटवतील.’
Post a comment