web-ads-yml-728x90

Breaking News

महाराष्ट्रातल्या सोलापूरचा प्रतीक चंद्रशेखर याबाजी, या विद्यार्थ्याच्या पत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्तर

BY - युवा महाराष्ट्र लाइव –  सोलापूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशातल्या जनतेशी संवाद साधण्याची आणि त्यांच्याशी स्वतःला जोडून घेण्याची एक वेगळीच शैली आहे.देशभरातून दररोज अनेक लोक त्यांना पत्र पाठवतात आणि त्यापैकी अनेकांना उत्तरही मिळतं. या पत्रांच्या माध्यमातून मुलांमध्ये असलेली त्यांची लोकप्रियता बघण्यासारखी आहे. पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्राला उत्तर येणं हा एक असा विलक्षण अनुभव आहे, ज्यांचं शब्दांत वर्णन करणं खूप कठीण आहे. असाच काहीसा अनुभव महाराष्ट्रातल्या सोलापूरचा  विद्यार्थी कुमार प्रतीक चंद्रशेखर याबाजी याला आला. त्याने पंतप्रधानांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रासोबत स्वतः काढलेलं एक चित्रही पाठवलं होतं. आपल्या पत्रात प्रतीकनं लिहिलं होतं की त्याला आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबालाच पंतप्रधान खूप आवडतात तसंच त्यांच्या विचार आणि कार्याचा त्या सगळ्यांवर खूप प्रभाव आहे.

या पत्राला उत्तर देतांना पंतप्रधानांनी प्रतीकचे आभार मानले आहेत आणि त्याने पाठवलेल्या चित्राबद्दल आपली प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे. आपल्या संदेशात पंतप्रधान लिहितात…

_“अत्यंत स्नेहमय पत्र आणि चित्राच्या रूपाने आपण ज्या भावना अभिव्यक्त केल्या आहेत, त्याबद्दल आपले आभार! अशा प्रेममय संदेशातूनच मला देशासाठी दिवसरात्र काम करण्यासाठी नवी ऊर्जा मिळते.  कला, मनातल्या भावनांना मूर्त रूप देण्यांचं आणि प्रभावी पद्धतीने इतरांपर्यंत पोहोचण्याचं एक सशक्त माध्यम आहे. आपण काढलेलं हे चित्र, चित्रकलेविषयीची आपली समज आणि चिकाटी दर्शवणारे आहे. मला विश्वास आहे की सातत्याने केलेला अभ्यास आणि चिकाटीने केलेल्या साधनेमुळे येत्या काळात आपली ही कला आणखी बहरत जाईल,अधिक उत्तम होईल. पत्र आणि चित्र पाठवल्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार ! आपल्याला उत्तम आरोग्य आणि उज्ज्वल भविष्य लाभो, या शुभेच्छा !!"_

आपला,

नरेंद्र मोदी

हे पत्र मिळाल्यावर कुमार प्रतीक चंद्रशेखर याबाजी आणि त्याचं कुटुंब अत्यंत आनंदात आहे. पत्र मिळाल्यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता की पंतप्रधान मोदी यांनी आपल्या अत्यंत व्यस्त दिनक्रमातून आपले पत्र केवळ वाचलंच नाही, तर त्याचं उत्तरही दिलं. उल्लेखनीय बाब म्हणजे पंतप्रधान मोदी विविध माध्यमातून देशबांधवांच्या सतत संपर्कात असतात  आणि सर्वांना समाज आणि देशासाठी योगदान देण्यासाठी प्रेरित करत असतात.

No comments