web-ads-yml-728x90

Breaking News

अनाथ बालकांच्या हक्कांच्या जपणुकीसाठी शासन संवेदनशील – महिला व बालविकास राज्यमंत्री बच्चू कडू

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

अनाथ बालकांच्या जपवणुकीसाठी शासन संवेदनशील असून त्यांना सक्षम करण्यासाठी विविध निर्णय घेण्यात येत असल्याचे महिला व बालविकास राज्यमंत्री श्री.बच्चू कडू यांनी सांगितले.मंत्रालयाच्या त्रिमुर्ती प्रांगणात आयोजित अनाथ पंधरवडा सांगता समारंभात राज्यमंत्री श्री. कडू बोलत होते. महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती इद्झेस कुंदन, आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद, दीपस्तंभ फौंडेशनचे संस्थापक यर्जुवेंद्र महाजन यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

महिला व बालविकास राज्यमंत्री श्री.बच्चू कडू म्हणाले, अपंग, अनाथ, शेतकऱ्यांना अर्थसंकल्पामध्ये ठळक स्थान असायला पाहिजे. अनाथांना शासकीय नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण देण्याचा क्रांतीकारी निर्णय राज्य शासनाने घेतल्याने त्यांच्या जीवनात पहाट येणार आहे. अनाथांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाकडून विविध पावले उचलण्यात येत असून त्यांनी देशाचे पालनकर्ते होण्याची स्वप्ने पहावीत असा प्रोत्साहक संदेश महिला व बालविकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला.

No comments