web-ads-yml-728x90

Breaking News

आधुनिक शेती विषयी शेतकरी आणि पशुपालकांना मार्गदर्शन

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव - शहापुर

शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून भविष्यात शेती अधिक व्यापक आणि तंत्रशुद्ध पद्धतीने करण्याची गरज आहे. यासाठी शेतकऱ्यांना तंत्रस्नेही बनविणे आणि शेती विषयक नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. या उद्देशाने ठाणे जिल्हा परिषदेच्या कृषी, पशुसंवर्धन विभागाच्या वतीने शहापूर तालुक्यातील आवरे या गावी शेतकरी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उदघाटन शहापुरचे आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणे जिल्हा परिषदेचे कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती संजय निमसे  हे होते. त्याचबरोबर महिला व  बाल कल्याण समिती सभापती रत्नप्रभा तारमळे, शहापूर पंचायत समिती सभापती रेश्मा मेंमाणे, उप सभापती जग्नानाथ पष्टे, जिल्हा परिषद सदस्य रेखा कंठे, कैलास जाधव, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. लक्ष्मण पवार, कृषि विकास अधिकारी श्रीधर काळे, शहापूर गट विकास अधिकारी अशोक भवारी, तसेच तालुका स्तरित कृषि व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व कर्मचारी आणि शेतकरी व पशुपालक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.ठाणे जिल्ह्यात शेतकरी व पशुपालकांची संख्या लक्षणीय असून प्रामुख्याने भात शेतीसह खरीप व रब्बी हंगामात विविध पिकं घेतली जातात. सध्या शेतीमध्ये प्रयोगशील बदल घडून येत असून यांत्रिकपद्धतीने शेती करण्यावर भर दिला जात आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील आधुनिक शेती तंत्रज्ञान  विकसित करून उत्त्पन्नवृद्धीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. या शिबिरातून याच बाबी ठळकपणे सांगण्यात आल्या. यासाठी राष्ट्रीय स्तरावरील कृषि तज्ञांनी  मार्गदर्शन केले. यामध्ये बांबू शेती व जलसंवर्धन विषयावर राजशेखर पाटील, दुग्ध व्यवस्थापन विषयावर सुभाष पाठारी, कुक्कुटपालन व्यवसाय विषयावर डॉ. नरेश बांगर, तर शेळी पालन आणि सेंद्रीय शेती या विषयावर अनुक्रमे गौरक्षनाथ चांदोरे आणि प्रथमेश पाठधरे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमा दरम्यान कृषि विभागाने कृषि अवजारांचे व सोलरचे प्रदर्शन भरवले होते.तर  पशुसंवर्धन विभागाने विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती सांगणारे दालन उभारले होते. तसेच या कार्यक्रमा दरम्यान पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती असणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषि विकास अधिकारी श्रीधर काळे यांनी केले तर प्रास्तविक डॉ. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. लक्ष्मण पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तरुलता धानके यानी केले.

No comments