web-ads-yml-728x90

Breaking News

राज्य सरकारचं एक पाऊल मागे;शिवजयंतीला आता १०० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

महाराष्ट्रासह देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाला नमन केलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसारची जयंती ही १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. राज्यभरात विविध उपक्रमांसह मर्दानी खेळ, मिरवणुका, ढोल ताशांच्या गजरात ही शिवजयंती साजरी केली जाते. फक्त देशात वा राज्यातच नाही तर गेल्या काही वर्षांमध्ये शिवजयंती प्रदेशात देखील उत्साहात साजरी केली जाते. मात्र, यंदा शिवजयंती साजरी करण्यावर कोरोनाचं सावट कायम आहे. कोरोना आटोक्यात आला असला तरी शिवजयंतीसाठी निर्बंध लावण्यात आले असल्याने शिवभक्तांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी याआधीच आयोजनाची तयारी झाली आहे. मात्र, बुधवारी राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढल्यामुळे गृहविभागानं नव्याने आदेश बजावून शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातले आहेत.भाजप, मनसे, संभाजी ब्रिगेड सह राज्यातील शिवभक्तांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर राज्य सरकारला एक पाऊल मागे घ्यावं लागलं आहे. सरकारने नवी नयमावली जाहीर केली असून शिवजयंतीला आता १०० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. याबाबत राज्य शासनाच्या गृहविभागाने नवीन परिपत्रक जारी केलं आहे. १०० लोकांच्या उपस्थितीला परवानगगी देण्यात आली असली तरी इतर निर्बंध मात्र राज्य सरकारने कायम ठेवले आहेत.

No comments