0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव –  पुणे

‘बिग बी’ अमिताभ बच्चन व अजय देवगण यांनी बारामतीला भेट दिली. यावेळी बारामती येथील विमानतळावर बच्चन आणि देवगण यांच्या आगामी हिंदी चित्रपटाचे काही चित्रीकरण पार पडल्याची माहिती मिळत आहे .त्यासाठी हे दोघे उपस्थित होते.

बारामती येथील विमानतळावर २००४ च्या दरम्यान, यापूर्वी देखील ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा,अक्षय कुमार यांच्या चित्रटाचे चित्रीकरण पार पडले आहे. मात्र, आजच्या चित्रीकरणाबाबत अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली होती.त्यामुळे बच्चन आणि देवगण यांच्या विमानतळावरील उपस्थितीबाबत बारामतीकर अनभिज्ञ होते. सुनेत्रा पवार यांच्यासोबतचे दोन्ही अभिनेत्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याबाबत बारामतीकरांना माहिती मिळाली.

Post a Comment

 
Top