web-ads-yml-728x90

Breaking News

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मराठी भाषा विभागाचे विविध पुरस्कार प्रदान

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा. मराठी भाषेचा जागर व्हावा यासाठी पुस्तकाचं गाव उपक्रम सुरू केला आहे. त्यामध्ये राज्यात एकच पुस्तकाचं गाव का असावे? असे नमूद करून तळा गाळातील मराठी भाषा, तिच्या वैशिष्ट्यांसह सर्वांपर्यंत पोहचावी यासाठी प्रयत्न करतो. मग मराठी भाषेचा विकास तिथपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न केले जातील. त्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक पुस्तकाचे गाव असायला हवे. त्यासाठी पुढील मराठी भाषा गौरव दिनापूर्वी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक गाव पुस्तकांचे गाव असेल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मराठी भाषा दिनानिमित्ताने मराठी भाषा विभागाचे विविध पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे यांच्यासह पुरस्कार प्राप्त मान्यवर उपस्थित होते.

No comments