web-ads-yml-728x90

Breaking News

अन्न व औषध प्रशासनाच्या छाप्यात१ कोटी ६० लाख २६ हजार २५९ रुपयांचा खाद्य तेलाचा साठा जप्त

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने नुकतेच मुंबई व पालघर  परिसरातील अनेक ठिकाणी  छापे टाकले असून चार खाद्यतेल रिपॅकर्स व घाऊकविक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.  सर्व ठिकाणी मिळून एकूण १ कोटी ६० लाख २६ हजार २५९ रुपयांचा खाद्य तेलाचा साठा जप्त करण्यात आला व एकूण ४० खाद्यतेलाचे नमुने विश्लेषणार्थ घेण्यात आले.

राज्यातील जनतेच्या आरोग्याची जबाबदारी हे प्राधान्य लक्षात घेवून, त्यांच्या दैनंदिन आहारातील अन्न पदार्थाचा दर्जा तपासण्याची जाणीव लक्षात ठेवून प्रशासनास प्राप्त होणाऱ्या गोपनीय माहितीच्या आधारे छापे टाकण्याची कार्यवाही करण्यात येते.राज्यातील अन्न व्यवसायाचा दर्जा उंचावणे तसेच अन्न व्यावसायिकांना अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या तरतुदींचे पालन करण्यासाठी मार्गदर्शन करणे हा देखील या छाप्यांचा हेतू असतो.मुंबई  आणि पालघर परिसरातील काही खाद्यतेल व्यावसायिकांवर नुकतेच छापे घालण्यात आले.

No comments