BY - युवा महाराष्ट्र लाइव – औरंगाबाद
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांची खूप वर्षाची औरंगाबादचे नाव संभाजीनगर करणे ही इच्छा आहे. ती पूर्ण होणार आहे अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते आढावा बैठकीसाठी शहरात आले होते. यावेळी पत्रकारांशी नामांतर मुद्द्यावर त्यांनी संवाद साधला.
ते म्हणाले, औरंगाबाद येथील नागरिकांची इच्छा आहे. त्यामुळे संभाजीनगर नाव देणे महत्त्वाचे आहे. तसेच औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचे पत्र मुख्यमंत्री यांनी केंद्र सरकारला पाठवले आहे. यावर लवकर निर्णय होणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारकडून महापुरूषांचे नाव देण्याबाबत कोणतीही अडचण असण्याचे कारण नाही. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात छत्रपती संभाजी महाराज यांना मानणारा देश आहे. त्यामुळे लवकर ते होईल असा विश्वास मंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
Post a comment