0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – नागपूर

गडचिरोली जिल्ह्यातील सन २०२१ ची ग्रामपंचायत निवडणूक मतप्रक्रिया १२ तालुक्यामध्ये दोन टप्यात ९२० मतदान केंद्रावर घेण्यात आली. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कोणत्याही प्रकारचा घातपात न होता, शांततेत संपन्न झाली. ज्यायोगे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी पोलीस विभागाची महत्त्वपूर्ण साथ लाभली, त्याबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गडचिरोली जिल्हा पोलीस विभागाचे मनःपूर्वक कौतुक केले आहे.

नक्षलवाद्यांच्या विचारसरणीचा अंत

गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम व नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील जिल्हा म्हणून परिचित आहे. निवडणुका म्हटले की, लोकशाही व शासनविरोधी कृत्य करण्यास नक्षलवाद्यांना संधी मिळते. पण त्यावर मात करून गडचिरोली पोलीस दलाच्या इतिहासात कधी नव्हे ते पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुकीत नवा विक्रम केला.

हा  जिल्हा  नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल व अतिदुर्गम गणला जावुन सुध्दा पोलीस दलाचे अथक परिश्रमाने व जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने ग्रामपंचायत निवडणुका कोणताही घातपात न होवु देता शांततेत संपन्न झाल्या. हे पाहता गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी विचारसरणीचा अंत होत आहे, असेही गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.

Post a Comment

 
Top