0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने मालमत्ता विक्रीच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकत चार मध्यम आकाराच्या बँकांची निवड केली आहे. ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने तीन सरकारी स्रोतांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. बँकिंग क्षेत्राच्या खासगीकरणामुळे शेकडो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येतील, असे बोलले जात आहे. दुसरीकडे, जास्तीत जास्त निर्गुंतवणुकीतून पैसा उभारण्याचे मोदी सरकारचे उद्दिष्ट आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक आणि सेंट्रल बँक या चार बँकांची नावे यादीत देण्यात आलेली आहेत. रॉयटर्सच्या हवाल्याने विविध माध्यमांनी सांगितले की, ही नावे अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाहीत. याप्रकरणी ‘एबीपी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार एका बँकरने म्हटले की, सरकार अशा बँकांची निवड करेल जे विलीनीकरणानंतर राहतील. यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे. या चार पैकी दोन बँकांची खासगीकरणासाठी निवड करण्याची शक्यता आहे.

Post a Comment

 
Top