0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात ते आपल्या गाण्यांमुळे त्याचबरोबर त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे देखील चर्चेत असतात. नुकतंच अमृता फडणवीस यांचं एक गाणं रिलीज झालं आहे. अमृता फडणवीस यांनी हे गाणं आपल्या ट्विटरवर पोस्ट केलं आहे. काल व्हॅलेन्टाईनं औचित्य साधून रिलीज झालं. त्यांचं हे गाणं जोरदार व्हायरल होत आहे. त्याचबरोबर या गाण्यानंतर अनेकांकडून प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. आहे. अमृता फडणवीस यांनी हे गाणं पोस्ट करताना, ‘हे आपलं आवडतं गाणं असल्याचं म्हटलं आहे. मी माझ्या व्हॅलेंटाईनसोबत आ़नंदी आहे,’ असं म्हणत त्यांनी दिलखेचक अंदाजात नवीन गाणं प्रेक्षकांच्या समोर आणलंय. ज्यावर कानसेन रसिकांनीही हजारो कमेंट केल्या आहेत. अमृता फडणवीस यांनी याआधी देखील अनेक गाणी गायली आहेत. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या हस्ते अमृता फडणवीस यांच्या गाण्याचा एक अल्बम देखील रिलिज झालेला आहे.

Post a Comment

 
Top