web-ads-yml-728x90

Breaking News

उपमुख्यमंत्री अजित पवार औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - औरंगाबाद

राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार सोमवारी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरात शहर आणि जिल्ह्यातील अनेक विकास कामे ठप्प झाली आहेत. त्या विकास कामांना गती देण्यासाठी तसेच आगामी काळात होणाऱ्या महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी अर्थसंकल्पात जिल्हाला झुकते माप मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागलंय. कोरोना संकटाच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर जिल्ह्यातील अनेक योजनांचा निधी कपात करण्यात आला होता. तर काही योजनांचा निधी वळवण्यात आला होता. कोरोना काळात सर्वाधिक निधी आरोग्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. हा निधी परत मिळावा यासाठी जिल्हा परिषद सदस्य देखील त्यांची भेट घेणार आहेत. तसेच आगामी काळात होणाऱ्या महानगर पालिका निवडणुका पाहता जिल्ह्याच्या पदरात आणखी काय पाडून घेता येईल, याचा प्रयत्न आघाडीचे नेते मंडळी करणार आहेत.

No comments