0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव –  नाशिक

साहित्य संमेलनाचे आयोजन करताना कोरोनाविषयक सर्व उपाययोजना करण्यात येणार आहेत. यासाठी महानगरपालिका व शासनाच्या आरोग्य विभागाचे सहकार्य घेण्यात येणार आहे. तसेच नाशिकमध्ये होणारे 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी सर्व साहित्यप्रेमी व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री व संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले.भुजबळ फार्म येथे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांचेसमवेत आढावा बैठकिनंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त व माजी आमदार हेमंत टकले, माजी खासदार तथा संमेलन समन्वय समीर भुजबळ, संमेलनाचे मुख्‍य समन्वयक विश्वास ठाकूर, मुकुंद कुलकर्णी,शंकर बोऱ्हाडे, दादा गोरे, पुंडलिक अटकरे, रामचंद्र कांळुखे उपस्थित होते.

Post a Comment

 
Top