0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - औरंगाबाद

महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सालाबादाप्रमाणे दिनांक १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. यंदा मात्र, कोरोनाचे नियम पुढे करून शिवजयंती साजरी करण्यावर महाविकास आघाडी सरकारने नियमावली जाहीर केली आहे. या निर्णया विरोधात मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने क्रांती चौकात राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने आंदोलन करण्यात आले.यावेळी विविध घोषणांनी क्रांती चौक परिसर दणानुन सोडला होता. यावेळी बोलतांनी समन्वयक रमेश केरे पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून सरकारचा तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो. राज्यात शिवजयंती धुमधडक्यात साजरी करण्याचे आवाहन रमेश केरे पाटील यांनी राज्यातील शिवप्रेमींना केले.

Post a Comment

 
Top