0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाच्या १० वी, १२ वी परीक्षांच्या निश्चित तारखा घोषित केल्या होत्या. परंतु कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे १० वी आणि १२ वीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत चालला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक शाळा आणि महाविद्यालये बंद होती. परंतु हळूहळू कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकारला यश येत आहे. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीर मंडळाच्या प्रचलित कालावधीमध्ये परीक्षा आयोजित न करता शासन मान्यतेने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षांच्या वेळापत्रक बदलण्यात आलंय. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र १२ वी परीक्षा आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र १० वी परीक्षा एप्रिल-मे २०२१ मध्ये अनुक्रमे २३ एप्रिल २०२१ ते २१ मे २०२१ आणि २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ मध्ये आयोजित करण्यात येणार आहेत.

Post a Comment

 
Top