0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव –  पुणे

गत काही वर्षात शहरातील वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. तसेच वाहतुक नियंत्रणाबाहेर गेली आहे. मेट्रो, मोनो रेल यासह सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सक्षम करण्यासाठी हालचालीही सुरू आहेत. मात्र, नियंत्रणाबाहेर गेलेल्या वाहतुकीसाठी शाश्वत पर्याय ठरणाऱ्या ‘हाय कॅपेसिटी मास्ट ट्रांझिस्ट रूट’च्या अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.आज केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी चांदणी चौक येथील एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आले होते. या प्रसंगी पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी भेट घेऊन एचसीएमटीआर रस्ता पुणे शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने किती महत्वाचा आहे. याबाबत चर्चा केली त्यांनी याबाबत होकार देऊन एचसीएमटीआर रस्त्यासाठी सीआरएफ फंडातून कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले असून पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांना याबाबत लवकरात लवकर निवेदन ठेवण्यास सांगितले आहे. त्यामुळे एचसीएमटीआरचा (रिंगरोड ) मार्ग आता सुखकर झाला आहे.

Post a Comment

 
Top