0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील तिसरा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर झाला. केंद्र सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही.  75 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या आणि ज्यांना निवृत्तीवेतन मिळते त्यांचा कर माफ करण्यात आला आहे. सोने आणि चांदीवरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय झाला. भारत पेट्रोलियम, आयडीबीआय बँक आणि एअर इंडिया यामध्ये निर्गंतवणूक करण्यात येणार आहे.  सोलर उत्पादनांवर आयात शुल्कात वाढ, कापूस आणि रेशीम उत्पादनांवर आयात शुल्क वाढवण्यात आल्याची घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली.  देशात 100 सैनिक स्कूल स्थापन करण्यात येणार आहेत. विमा कायदा आणि बँक कायद्यांमध्ये बदल केला जाणार आहेत. डिझेलवर 4 रूपयांचा कृषी सेस, पेट्रोलवर 2.5 रुपयांचा कृषी सेस लावण्यात आल्यानं पेट्रोल लवकरच शंभरी पार करु शकते.

Post a Comment

 
Top