web-ads-yml-728x90

Breaking News

चार तृतीयपंथीयांची वाहतूक पोलिसाला लाथाबुक्क्यांनी मारहाण

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – घाटकोपर

घाटकोपर पंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार तृतीयपंथीयांनी वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. सहा जणांनी मिळून ट्रॅफिक हवालदाराला मारहाण केली असून, त्याचा एक व्हिडिओ बनवला, त्यानंतर ट्रॅफिक हवालदाराने पंतनगर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्या चारही आरोपींना अटक करण्यात आलीय. ड्युटीवर असताना पोलीस हवालदाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण विक्रोळी वाहतूक विभागात कार्यरत असलेले 38 वर्षांचे विनोद बाबुराव सोनवणे छेडानगर सब वे येथे ड्युटीवर असताना काल संध्याकाळी 6 ते 6.30 वाजताच्या दरम्यान एका रिक्षातून चार जण प्रवास करत होते. त्यावेळी ट्रॅफिक हवालदार विनोद सोनावणे यांनी त्यांच्या रिक्षा अडवली आणि रिक्षाचा फोटो काढला. विशेष म्हणजे रिक्षात बसलेले चारही जण तृतीयपंथीय होते. त्यानंतर तृतीयपंथीयांनी रिक्षातून खाली उतरत ट्रॅफिक हवालदार विनोद सोनवणे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हवालदार आणि तृतीयपंथीयांमधील बाचाबाची थेट हाणामारीपर्यंत पोहोचली आणि त्या तृतीयपंथीयांनी हवालदाराला बेदम मारहाण केली. एका तृतीयपंथीयानं हवालदाराच्या शर्टाची बटणं तोडली, तर दुसऱ्या एकानं डोक्यावरील टोपी आणि वॉकीटॉकीचे नुकसान केले. त्यानंतर त्या चारही तृतीयपंथीयांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याविरोधात कलम 353, 332, 294, 427, 504, 34 भादंवि अन्वये गुन्हा नोंदवण्यात आलाय.

 

No comments