0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली

गेल्या काही दिवसांपूर्वी Amazon Prime Video वर प्रदर्शित झालेल्या ‘तांडव’ वेब सीरीजमधील काही दृश्यांमुळे विशिष्ट लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप झाला होता. तसेच शेतकरी आंदोलनामध्ये सोशल मिडियाचा वापर कशा प्रकारे करण्यात आला. व त्यामुळे कसे पडसाद संपूर्ण देशभरात पडले हे संपूर्ण भारताने पाहिले. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्ली येथे आज पत्रकार परिषेद घेतली. व सोशल मिडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मला आता नियमावली जाहीर करून त्यांना आता सरकारच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात येणार असल्याचे समजत आहे.भारतात सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. यामुळे काही लोक सोशल मीडियाचा चुकीच्या पद्धतीने वापर करत आहेत. यामुळे यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी हे नियम गरजेचे आहेत असे रवी शंकर प्रसाद यांनी या पत्रकार परिषेदेत म्हंटले आहे.

Post a comment

 
Top