0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

स्वतः नशामुक्त राहून नशामुक्तीसाठी तृतीयपंथी समाजाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.नशामुक्त भारत अभियानाच्या माध्यमातून १५ ऑगस्ट  २०२० ते ३१ मार्च २०२१ या दरम्यान संपूर्ण भारतात व्यसनमुक्तीचा प्रचार करण्यात येत आहे. या अंतर्गत तृतियपंथीयांनी स्वतः निर्व्यसनी राहुन याबाबत समूपदेशन, उपचार, प्रचार करावा या उद्देशाने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला.जिल्हाधिकारी श्री. निवतकर म्हणाले, यांनी तृतीयपंथीयांच्या विविध समस्या आणि व्यसनांसमवेत जोडला जाणारा संबंध यापासून कसे परावृत्त होता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. तृतियपंथीयांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. निवतकर यांनी केले.

Post a Comment

 
Top