web-ads-yml-728x90

Breaking News

मराठी भाषा दिना निमित्त मनसेतर्फे स्वाक्षरी अभियान

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाशी विभाग तर्फे  27 फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिनानिमित्त " मी मराठी माझी स्वाक्षरी मराठी " कार्यक्रम वाशी सेक्टर 9 वाशी बस स्थानक येथे आयोजित करण्यात आला होता. मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी मराठीमध्ये स्वाक्षरी करून कार्यक्रमाची सुरवात केली. सदर कार्यक्रमाचे आयोजन नवी मुंबई शहर सहसचिव अमोल इंगोले - देशमुख आणि वाशी विभाग अध्यक्ष अशोक भोसले यांनी केले होते. सदर प्रसंगी नवी मुंबई  शहर सचिव विलास घोणे, महिला सचिव यशोदा खेडस्कर, सहसचिव अरुणा राठोड, उपविभाग अध्यक्ष राजीव गावडे, शाखा अध्यक्ष अमोल बनसोडे, गणेश तेवर, उपशाखा अध्यक्ष रोहित किटो, दिपकचंद डिग्गीकर, तुर्भे शाखा अध्यक्ष कृष्णा कांबळे, महादेव सोळंखे, प्रदीप अडसूळ, महिला शाखा अध्यक्ष संगीता वंजारी ताई,  महाराष्ट्र सैनिक संजय शिर्के, तसेच रोजगार स्वयंरोजगार चे शहर संघटक सनप्रीत तुरमेकर, उपशहर संघटक अनिकेत पाटील तसेच महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मनसे आयोजित या उपक्रमाला जनतेचा, नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याचे अशोक भोसले मनसे वाशी विभाग अध्यक्ष यांनी सांगितले.

No comments