web-ads-yml-728x90

Breaking News

मुंबई-पुणे महामार्गावर खोपोलीजवळ भीषण अपघात

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सोमवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. कंटेनरने इनोव्हा, क्रेटा कार, टेम्पो आणि ट्रकला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. ट्रेलरने पाठीमागून धडक दिल्याने वाहने एकमेकांवर आदळली. पुण्याहून मुंबईकडे ही वाहने जात असताना मुबंई-पुणे महामार्गावरील मुबंई लेनवरील किमी फुडमॉलजवळ ही घटना घडली. एका कंटेनरने इनोव्हा, क्रेटा कार, टेम्पो आणि ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने पाच वाहनाचा विचित्र अपघात झाला. या अपघातात या वाहनांमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील दोन जखमींना अष्टविनायक (पनवेल) आणि अन्य दोघांना वाशी येथे मनपा रुग्णालयात आणि एकाला इतर रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर मृतांना खोपोली रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

No comments