web-ads-yml-728x90

Breaking News

राजपत्रित अधिकारी महासंघाच्या बहुउद्देशीय कल्याण केंद्राचे भूमिपूजन

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पस्तिसाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून वांद्रे (पूर्व) येथे बहुउद्देशीय कल्याण केंद्राचा भूमिपूजन कार्यक्रम आज राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तसेच पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. राज्यभरातून शासकीय कामकाजासाठी मुंबईत येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विश्राम आणि निवासाची सोय व्हावी याकरिता महासंघाच्या आठ मजली बहुउद्देशीय अशा कल्याण कें द्राची उभारणी येथे होत आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीस कर्मचाऱ्यांचे जेष्ठ नेते दिवंगत र. ग. कर्णिक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकजुटीने आणि संयमाने कार्य करून कोविड आपद्ग्रस्त स्थिती नियंत्रणात आणली, असे कौतुकोद्गार मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले. एकूण ७० विभागांच्या संघटनांना एकत्रित ठेवत तब्बल ३५ वर्षे सातत्यपूर्ण यशस्वी संघटनात्मक वाटचाल करणाऱ्या अधिकारी महासंघाच्या सर्व विधायक कार्यांना शुभेच्छा देत त्यांनी पाठिंबा दर्शविला.

 

No comments