BY - युवा महाराष्ट्र लाइव – जालना
औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील मुरमा फाट्याजवळ भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या हा अपघात झाला. मुस्तफा लालाखाँ पठाण (३५), कडुभाऊ निवृत्ती काशीद (३५, दुनगाव) अशी मृतांची नावे आहेत.
अंबड तालुक्यातील दुनगाव दर्गा येथील मुस्तफा लालाखाँ पठाण आणि कडुभाऊ निवृत्ती काशीद हे मिस्त्रीचे कामाचे साहित्य आणण्यासाठी दुचाकीवरून पाचोडकडे जात होते. दरम्यान, औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील मुरमा फाट्याजवळ बीडकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
Post a comment