web-ads-yml-728x90

Breaking News

पटेल यांना पुन्हा ईडीची नोटीस

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - नवी दिल्ली

शिवसेनेचे दिग्गज नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली आहे. वर्षा राऊत यांनी पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या ५५ लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली होती. भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरलेले दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ वर्षा राऊत यांनाही ईडीची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होते.

हवाई वाहतूक करारातील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांना सक्तवसुली संचालनालयाच्या ED कार्यालयात आपली साक्ष नोंदविण्यासाठी याआधी हजर झाले होते. परंतु आता पुन्हा एकदा प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा ईडीचे समन्स आलेली आहे. पटेल यांच्यावर आता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा नातेवाईक इकबाल मिर्ची याच्यासोबत आर्थिक आणि जमीन व्यवहारप्रकरणी त्यांचे नाव समोर आले आहे.

ड्रग्स माफिया इकबाल मिर्चीचे आयएसआशी कनेक्शन असल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात ईडीने एक आरोपपत्र दाखल केले होते. मिर्चीची बायको हाजरा आणि मुले जुनेद आणि आसिफ यांच्यासह आणखी काही जणांवर हे आरोपपत्र दाखल करण्यात आले होतं.दरम्यान, पटेल यांच्या मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडने २००६-०७ मध्ये ‘सीजे हाऊस’ नावाची इमारत बांधली आणि तिचा तिसरा आणि चौथा मजला मिर्चीची पत्नी हजारा इक्‍बाल यांना हस्तांतरित करण्यात आला. ज्या जागेवर इमारत बनविली गेली ती मिर्चीची असल्याचे सांगितले जाते. ‘मनी लॉंन्डरिंग’, ड्रग्सची तस्करी आणि खंडणीखोरीच्या गुन्ह्यांमधून ही जमीन विकत घेण्यात आल्याचा तपास अधिकाऱ्यांचा दावा आहे.

No comments