web-ads-yml-728x90

Breaking News

भिवंडी कोनगाव सह राज्यभरात रस्ता सुरक्षा अभियान..!

BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – भिवंडी

रस्ते अपघातास आळा बसावा तसेच नागरिकांत वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने यंदा ४ ते १० फेब्रुवारी दरम्यान राज्यभरात रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आले.या अभियानांतर्गत परिवहन विभाग, वाहतूक पोलिस, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग व अन्य सरकारी विभागांच्या सहकार्याने रस्ता सुरक्षेसाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. अशीच मोहिम भिवंडी कोनगाव चौकीत पोलिस आयुक्त ठाणे विभागाचे विवेक फणसळकर यांच्या अध्यक्षतेखाली पो.सह आयुक्त सुरेश मेखला, पो.सह आयुक्त वाहतुक विभाग बाळासाहेब पाटील, पो.सह आयुक्त वाहतुक विभाग भिवंडी संजय शिंदे, पो.नि.वाहतुक उप विभाग कोनगावअशोक थोरात, स.पो.नि दादासो एडके, वाहतुक उपविभाग कोनगाव संतोष भालेराव, मेजर घाडगे - भिवंडी कोनगाव यांनी या अभियानात जनजागृतीवर विशेष भर दिला. शहरातील महत्वाच्या ठिकाणी चौकसभा आयोजित करुन वाहनचालकांना मोटार वाहन कायद्याची माहिती देणे, वाहनचालकांसाठी वाहतूक प्रबोधनपर कार्यशाळा आयोजित करणे, महामार्गांवरुन जाणाऱ्या वाहनांना तसेच बैलगाड्यांना रिफ्लेक्टर लावणे, वाहतूक सिग्नलची देखभाल दुरुस्ती करणे, अवैध प्रवासी वाहतूक अवजड वाहतुकीवर कारवाई करणे, लायसन्सबाबत जनजागृती करणे, रस्ते सुरक्षाबाबत शालेय विद्यार्थ्यांना माहिती देणे, रस्ता सुरक्षाबाबत निबंध, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करणे, घोषवाक्य स्पर्धा आयोजित करणे यांसारखे उपक्रम राबवण्याच्या सूचना परिवहन विभागाने दिल्या. या व्यतिरिक्त अन्य सरकारी विभागांनीही या काळात कोणते उपक्रम राबवायचे आहेत, याबाबत परिवहन विभागाने सूचना दिल्या. जिल्हा स्तरावर जिल्हा रस्ते सुरक्षा समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने रस्ता सुरक्षा अभियानाचे नियोजन करण्याच्या सूचना परिवहन विभागाने दिल्या.

No comments