0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव –  बुलडाणा

लोणारसारखी स्थळे हे महाराष्ट्राचे वैभव आहेत. या वैभवाचे जतन, संवर्धन करुन त्यांचा विकास करण्यास शासनाचे प्राधान्य आहे. हा विकास करताना स्थानिक गावकऱ्यांचे प्रश्न समाजावून घेऊ, त्यांची सोडवणूक करू व त्यांचा सहभागही ह्या विकास प्रक्रियेत करुन घेऊन हा आराखडा राबविण्यात येईल. याच धर्तीवर ‘मातृतीर्थ सिंदखेडराजा’ चा ही विकास करण्यात येईल, तेथेही आपण लवकरच भेट देऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

 ठाकरे यांनी लोणार येथील जगप्रसिद्ध सरोवराची पाहणी करून या परिसराचे जतन संवर्धन व विकासाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हा परिषद अध्यक्षा मनिषा पवार, खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमूलकर,आमदार संजय गायकवाड, आमदार राजेश एकडे, लोणार नगराध्यक्ष पूनम पाटोळे, मुख्य सल्लागार अजोय मेहता, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी एस.राममूर्ती, विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रशेखर मिना, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया,  माजी आमदार डॉ. शशीकांत खेडेकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top