0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – उरण

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे  आणि शासनाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सल्ल्याने गुरुवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी  मनसेच्या वतीने जेष्ठ नागरिक सभागृह नवीन पनवेल येथे घेण्यात येणारा  नोकरी व व्यवसाय मेळावा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. सदर निरोप सर्व लोकांकडे न पोहचल्या कारणाने सुमारे 150  बेरोजगार तरुण तरुणी सोशल व फिजिकल डिस्टन्स पाळून ह्या ठिकाणी उपस्थित झाले होते.  ह्या  बेरोजगार जनतेला उत्तर देण्याकरिता व त्यांची माहिती घेण्या करिता, मनसे रोजगार विभागाचे अध्यक्ष महेंद्र बैसाणे,  मनसे रोजगार विभागाचे रायगड जिल्हा संघटक रामदासभाई पाटील आणि खालापूर तालुका संघटक संजय तन्ना उपस्थित होते.ह्यावरून असे कळते की जनतेला लोकडाऊन आणि कोरोनाची चिंता नसून स्वतःच्या रोजगाराची व पोटापाण्याची चिंता आहे.आणि ह्या चींतेपासून मुक्त होण्याकरिता ह्या बेरोजगार लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना  नक्कीच प्रयत्न करत आहे.

ह्या ठिकाणी रिलायन्स स्मार्ट ह्या समूहाने 50 तरुण तरुणींचे बायोडाटा निवडले आहे व त्यांना ह्या समूहाकडून त्वरित नोकरी देण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेना  रोजगार विभाग रायगड जिल्हाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.बेरोजगारांना नोकरीं मिळाल्याने बेरोजगार युवकांनी मनसेचे आभार मानले.

Post a comment

 
Top