web-ads-yml-728x90

Breaking News

महाराष्ट्रातील औरंगजेबी 'शिवद्रोही' सरकारचा धिक्कार - संतोष शिंदे

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – पुणे

छत्रपती शिवाजी महाराज यांची 390 वी जयंती 19 फेब्रुवारी रोजी आहे. महाराष्ट्रात लाखो शिवप्रेमी सरकारचे सर्व नियम पाळून धुमधडाक्यात साजरा करण्याचे नियोजन पूर्ण केलेले आहे. मात्र कोरोना (Covide-19) चे कारण देऊन सरकारने यावर्षी गर्दीचे कारण देऊन 'शिवजयंती' कार्यक्रम रद्द करण्यात निर्णय घेतला असून तसा औरंगजेबी 'फतवा' सरकारने काढला आहे. या फतव्याचा व ठाकरे सरकारच्या निर्णयाचा संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राच्या वतीने सर्वप्रथम जाहीर निषेध...राष्ट्रवादी काँग्रेसचा जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर संवाद दौरा चालू आहे, पोलिस त्यांना परवानगी देतात... शिवजयंतीला मात्र बंदी घातली जाते.  भाजपचे सर्व राष्ट्रीय नेते महाराष्ट्र पश्चिम बंगाल'सह देशभर फिरत आहेत... त्यांच्या कार्यक्रमाला परवानगी मिळते मात्र शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बंदी घातली जाते. तसेच काँग्रेस व शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री महाराष्ट्रभर शेकडो लोक घेऊन फिरतात, कार्यक्रम घेतात मात्र पोलिस त्यांना परवानगी देतात आणि सरकार शिवजयंतीच्या कार्यक्रमाला बंदी घातली जाते... हे निषेधार्ह आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. शिवजयंतीच्या कार्यक्रमातून समता, समानता आणि बंधुता प्रस्थापित केली जाते. सगळ्यांना सोबत घेऊन कार्यक्रम केले जातात. एक चांगला संदेश समाजामध्ये देण्याचा प्रयत्न प्रत्येक शिवप्रेमी करतो. अशा या सुंदर कार्यक्रमावर महाराष्ट्रचे सरकार जर बंदी घालत असेल तर ते निषेधार्ह आहे. सरकारने काढलेला फतवा तात्काळ पाठीमागे घेऊन शिवजयंतीच्या कार्यक्रमाला सरसगट परवानगी द्यावी... वेळ पडली तर 'मिरवणूका रद्द करा, मात्र कार्यक्रम झाले पाहिजेत...' अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. सरकारने काढलेल्या या फतव्यात विरोधात महाराष्ट्रातील प्रत्येक शिवप्रेमी प्रचंड संतापलेला आहे. म्हणून सरकारने शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करून  तात्काळ बंदी उठून परवानगी द्यावी असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.

No comments