0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

कोरोना संसर्ग देशात येऊन एक वर्ष होत आले. मात्र कोरोनाची इतिश्री अद्याप झालेली नाही. यास्तव सर्व नागरिकांनी यापुढेही सातत्याने कोरोनाबद्दल सावधगिरी बाळगावी, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या वतीने राजभवन येथे विविध क्षेत्रातील ३५ कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र, केरळ यांसह काही राज्यात कोरोनाचे रुग्ण पुनश्च वाढत आहेत. कोरोनासंदर्भात बेफिकीरीने न राहता सावधगिरी बाळगून परंतू निर्भयतेने काम करण्याचे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.जगाच्या तुलनेत भारतात कोरोना रुग्णांची तसेच बळींची संख्या कमी होती. देशातील समाज सेवक, शासकीय कर्मचारी, पोलीस, स्वच्छताकर्मी यांनी कोरोना काळात अतिशय उत्कृष्ट काम केले व त्यांना देशातील दानशूर व्यक्तींनी चांगले सहकार्य केले. त्यामुळेच भारत कोरोनाचा मुकाबला चांगल्या पद्धतीने करू शकला, असे राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी सांगितले.

Post a Comment

 
Top