web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाडची ठेकेदारी बंद करा एकही पुढारी मुरबाड मध्ये दिसणार नाही

 BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

सध्या राजकारणाचा टेंड वेगळयाच वळणावर जात आहे.जनतेचे नांव घेवुन विकासाचा झेंडा पेक्षाच्या पंखाखाली दुसर्‍याच्या इशार्‍यावर भाकरीचे तुकडे मोडुन स्वताला नेता समजुन पत,प्रतिष्ठा,खुर्ची,पद मिळवण्यार्‍याच्या हातुन समाजाची सेवा होत नाही लोकाचे प्रतिनिधीत्व करण्याचा ढोंग आणि ठेकेदारी टक्केवारीचं सोंग घेणार्‍याचा वास्तव ग्रामीण भागात दिसत आहे.परन्तू शासनाने फक्त शासकीय सर्व विभागातील टेंडर सोसायटया ठेकेदारी पाच वर्षासाठी बंद करून रोजगार हमी प्रत्यक्ष मजुरांना काम दयावे असे केल्यास मुरबाड मध्ये एकही ठेकेदार टक्केवारी धारक दिसणार नाही सगळे बदलापुर कल्याण ठाणे येथे वास्तव्याला दिसतील आणि खरी समाजसेवा आवतरेल

  खरतर मुरबाड तालुक्यात खरी समाज सेवा सामाजिक संघटना समाजसेवकच करतात शाळेचे मुलाचे दाखले निराधार योजना उत्पन्न दाखले जातीचे दाखले रेशनिग कार्ड यासह छोटया मोठया समस्या तहसिलदार कार्यालय सह वनविभाग पंचायत समिती पोलिस ठाणे तालुका कृषी विद्युत मंडळ शाळा कॉलेज नगरपंचायत ग्रामपंचायती अशा सर्वच शासकीय कार्यालयात समाजसेवक पत्रकार जनसेवा करतात तेथे मात्र पद पक्ष लोकसेवक लोकप्रतिनिधी पदाधिकारी काम करत नाहीत याचा पुरावा स्वता समस्याग्रस्त अधिकारी देतीलच.सत्ताधारी विरोधक दोघांचे समर्थक ठेकेदारी करतात त्यामुळे ऐकामेकांची उनीव काढत नाहीत.ऐकामेकाविरोधात सोडाच प्रशासनाच्या विरोधात सामान्य माणसासाठी मोर्चे काढत नाहीत आंदोलने करत नाहीत आपल्या मतलबा साठी बॅनरबाजी पक्ष चळवळीसाठी देखावे मोर्चे आंदोलने होतात या सर्वाचा इटाळ जनतेला आला आहे.परंन्तु सरकारच सामान्याची बाजू घेत नाही.सरकारने फक्त पाच वर्षे मुरबाड मधील ठेकेदारी बंद करावी शासकीय टेंडर बंद करावे प्रशासनाने प्रशासकीय स्तरावर काम करावे पहा निवडणुका लढण्यासाठी कोणी गांव शहर सोडुन येणार नाही आणि ठेकेदारी करणारे बदलापुर कल्याण येथे राहुन मुरबाड शहरात गांवात तालुक्यात निवडणुका लढवण्यास येणार नाहीत नेतेगिरी करणार नाहीत मतदार यादयात घोळ करणार नाहीत पैशाच्या जोमावर निवडणुका जिंकणार नाहीत मायबाप महाविकास अघाडी सरकारने हा प्रयोग पाच वर्षे राबवावा कोणीही पक्षांतर सुध्दा करणार नाही

No comments