web-ads-yml-728x90

Breaking News

भारतामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली

देशात कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाल्यानंतर हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथीलता करण्यात आली. त्यामुळे कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून भारतात सर्व काही पूर्ववत होत आहे. पण काही जण कोरोना संदर्भातील नियम पाळत नसल्यामुळे आता कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. सध्या कोरोनाचं संकट भारतामध्ये पुन्हा एकदा डोकं वर काढत असताना दिसतंय. राजकीय पक्षांचे कार्यक्रम, लग्न समारंभ, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. यामुळेच भारतामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे गेल्या वर्षी २३ मार्च रोजी लॉकडाऊन लागू केला होता. देशातील सर्वच भागातील शाळा तेव्हापासून बंद होत्या. त्यानंतर तब्बल आठ महिन्यांनी कोरोनावर प्रभावी ठरेल अशी सीरम इन्स्टिट्युटची लस बाजारात आली आणि आता लसीकरणाची मोहीमही सुरू झाली आहे. दरम्यान, शाळा सुरू झाल्यानंतर तिथे विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह सापडण्याच्या अनेक घटना देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आढळून आल्यामुळे, एवढ्यात शाळा पुन्हा सुरू कराव्यात किंवा नाही? यावर चर्चा सुरू झाली आहे.

No comments