web-ads-yml-728x90

Breaking News

मराठमोळ्या कबड्डी करीता राज्यातील सर्वच जिल्ह्यात शालेय स्तरावर आधुनिक प्रशिक्षण देणार - राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सचिंद्र आयरे

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

कबड्डी खेळाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरण गांवातील लालबाग येथील मनोरंजन मैदानात सचिंद्र आयरे फाऊंडेशन, राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान, व मुंबई शहर कबड्डी असोसिऐशन यांच्या सहकार्याने ८ ते १४ वयोगटातील कबड्डी प्रशिक्षण घेतलेल्या यशस्वी शालेय कबड्डी पट्टुंना योग्य व्यायाम,सकस अहार मार्गदर्शन आणी प्रमाणपत्र वितरण समारंभ व फाऊंडेशन च्या द्वितीय वर्धापण दिनी राष्ट्रीय खेळाडू व  फाऊंडेशन चे संस्थापक सचिंद्र आयरे  बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भारतीय कबड्डी संघाचे नेतृत्व केलेले कर्णधार तारक राऊळ,नुकताच मुंबई महापौर पुरस्कार मिळवलेले लालबाग मधील कबड्डी पट्टू रविंद्र करमरकर,संपादक मधुकर आयरे,जान्हवी सकपाळ,दिपाली मुसाडकर,कृष्णकांत मनीयार,क्षितीज भोईटे व मुंबई कबड्डी असोसिऐशन चे पदाधीकारी व मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमात कोरोना महामारीत तसेच मुंबई व ग्रामीण भागात क्रीडा, सामाजिक,आरोग्यं, कृषी आणि शैक्षणिक या क्षेत्रामध्ये निपून कर्तुत्ववान लोकांचा स्व.सुधाकर तुकाराम आयरे सामाजिक ट्रस्ट रिंगणे यांच्यावतीने व सचिंद्र आयरे फाऊंडेशन, राजे शिवाजी युवा प्रतीष्ठानतर्फे सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.यावेळी लालबाग,परळ गिरण गावातील मंडळी उपस्थित होती.

No comments