web-ads-yml-728x90

Breaking News

सरकारी रूग्णालय आवारात मातीवर डांबरीकरण;अधिकारी ठेकेदाराच्या भ्रष्टाचाराला सरकार भागीदार

BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे

मुरबाड ग्रामीण रूग्णालयाच्या आवारात 75 लाखाच्यावर निधीचा विनाटेंडर विना वर्क ऑडर मातीचा चिखल झालेल्यावर डांबरीकरण सुरू आहे.अशा निकृष्ट कामाच्या भ्रष्टाचाराला लगाम घालण्यास महाविकास अघाडी सरकार अपयशी ठरले आहे.वैघकीय जिल्हा अधिकारी सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अधिकारी मुरबाड येथील सार्वजनिक बांधकाम उपअभियंता सत्यजित कांबळे शाखा अभियंता आणि भाजपाचे खासदार आमदार यांचे समर्थक हे बोगस काम करत असल्याने सामान्य नागरिक वृत्तपत्रातील बातम्या यांची चौकशी होऊन कारवाई होत नाही.

 


   शिवसेना-राष्ट्रवादी नेते मंत्री यांचा ठाणे जिल्हयात भाजपा पुढे काही चालत नाही का? सत्ताधायाचं असं काय सिक्रेट आहे की भाजपाच्या बोगस ठेकेदारीवर कारवाई होत नाही तशी 10 टक्केवारी सुरू आहे मात्र ठाणे जिल्हयात भाजपा समोर महाविकास अघाडी सरकार नामोहरम झाल्याचे स्पष्ट होते.ज्या ट्रामाकेअर सेन्टरचे काम ठेकेदारानी पुर्ण निधी काढुन अपुर्ण ठेवली होते त्याचाच अपुर्ण कामाचा टेंडर काढुन 27 लाखाचा निधी खर्च झाला त्याचही काम अपुर्ण असताना त्याच ट्रामाकेअरला कोव्हीड सेन्टर बनवुन 80 लाखाचा विनाटेंडर काम करण्यात आलं आता त्याच कोव्हीड सेन्टरच्या नावाखाली 75 लाखाच्यावर रस्ता मातीवर डांबर टाकून बनवण्यात येत आहे.अशा कोटीच्या भ्रष्टाचाराची ठेकेदारी भाजपाचे खासदार आमदार यांचे समर्थक करत असुन महाविकास अघाडी सरकारचे मुख्यमंत्री आरोग्यमंत्री पालकमंत्री त्यावर कारवाई

करत नाहीत खरतर राजकारण हा ठेकेदारीचा पिंड आहे विना धंदापाण्याचा विना मेहनतीचा फुकट खावू शासनाचा निधी लाटण्याचा धंदा आहे तोच धंदा मुरबाड मध्ये भाजपाचा तेजीत आहे.दुसरीकडे तेरी भी चुप मेरी भी चुप असुन आंदोलने सत्ताधारी - विरोधकाची नौटंकीतर नाही ना असा सवाल जनता करत असुन मुरबाडच्या अधिकार्‍याना निलंबित करावे विनाटेंडर विना वर्क ऑडर कामे करणाया ठेकेदार एजंन्सा काळया यादीत टाकाव्यात अधिकार्‍याना निलंबित करावे.इस्टीमेन्ट प्रमाणे कामे केली जात नाहीत रात्री कामे केली जातात अधिकार्‍याना 10 ते 20 टक्के देवुन ठेकेदार भ्रष्टाचार करत आहेत याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

 

No comments