web-ads-yml-728x90

Breaking News

राज्यपालांच्या हस्ते हिंदुस्तानी प्रचार सभेचे ‘हिंदी पत्रिका प्रकाशन पुरस्कार’ प्रदान

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

हिंदी ही संपूर्ण देशाला तसेच हृदयांना जोडणारी भाषा आहे. भारतासह नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान, मोरिशस आदींसह अनेक देशातील लोकांना हिंदी भाषा सहजतेने समजते. हिंदी भाषेच्या प्रचार-प्रसाराचे कार्य आपुलकीने करत ही भाषा वाढवली पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.महात्मा गांधी यांनी १९४२ मध्ये स्थापन केलेल्या हिंदुस्तानी प्रचार सभेतर्फे दिले जाणारे ‘महात्मा गांधी हिंदी पत्रिका प्रकाशन पुरस्कार’ राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे प्रदान करण्यात आले. दिल्ली येथून प्रकाशित होणाऱ्या ‘नया ज्ञानोदय’ ला प्रथम पारितोषिक, ‘व्यंग यात्रा’ला द्वितीय तर ‘हंस’ या नियतकालिकाला तृतीय पारितोषिक प्रदान करण्यात आले. स्पर्धेत सहभागी झालेल्या देशभरातील ४६ हिंदी नियतकालिकांमधून ३ मासिकांची निवड करण्यात आली.

No comments