web-ads-yml-728x90

Breaking News

पाणी ही संपत्ती आहे.पाण्याची नासाडी होऊ नये - पालकमंत्री सुभाष देसाई

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – औरंगाबाद

पाणी ही संपत्ती आहे.पाण्याची नासाडी होऊ नये, त्यासाठी योग्य नियोजन करून सिंचित क्षेत्र वाढविण्यावर भर द्यावा, अशा सूचना उद्योग मंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आज केल्या. गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या सभागृहात कालवा सल्लागार समितीची बैठक देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पालकमंत्री म्हणाले, ज्या प्रकल्पातील पाणी आहे, त्याच प्रकल्पाला ते मिळणे आवश्यक आहे. यासाठी महामंडळाने पाठपुरावा करावा. नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या संपादित केलेल्या जमिनींचा मोबदला त्यांना त्वरीत द्यावा, यासाठी आमदार बोरनारे यांनीही पाठपुरावा करावा. कालव्यांची दरवाजे, चाऱ्यांची दुरूस्ती फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण करावी. बाष्पीभवनातून पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. पाण्याचा वापर सुनियोजितरित्या सुक्ष्मपद्धतीने योग्यरित्या होण्यासाठी सर्व यंत्रणांनी काम करावे.

पाण्याच्या अपव्यय होणार नाही, यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. महामंडळाद्वारे कालवे, चाऱ्यांची दुरूस्ती करण्यासंदर्भात, उर्वरीत कामांसंदर्भात, निधीबाबत प्रस्ताव द्यावा. त्याचबरोबर कालव्यांच्या दुरूस्तीवर अधिक खर्च होणार नाही यासाठी वितरिकेबाबत डेमोपद्धतीने कार्यवाही करण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना ही देसाई यांनी अधिकाऱ्यांना या वेळी दिल्या.

 

No comments