web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड मध्ये महाविकास अघाडी सरकारची भाजपाशी ठेकेदारी भागिदारी ?

 


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री झाले मंत्री झाले मात्र शिवसेनेचे पारदर्शक मुख्यमंत्री म्हणुन ज्यांच्याकडे पाहिले जाते त्यांच्या राज्यातही मुरबाड मधील बोगस कामे विकासाच्या नावे टक्केवारीची ठेकेदारी टेंडर वर्क ऑर्डर अगोदरच कामे सुरू आहेत त्यांच्या तक्रारी झाल्या मिडीयात बातम्या आल्या तरीही कारवार्इ होत नसल्याने अघाडी सरकारशी भाजपाशी भागिदारी तर नाही ना? असा सवाल जनतेमधुन केला जात आहे.

  मुळचे राष्ट्रवादी काँगे्रस मधुन भाजपा सेनेत केवळ पद खुर्ची आणि ठेकेदारीने बोगस कामे यासाठी पक्षांतर केलेल्याची मुरबाड मध्ये ठेकेदारी जोरदारी सुरू असून खरे निष्ठावंत शिवसैनिक भाजपा कार्यकर्ते मात्र पक्षाच्या भुमिकेचे काम करताना दिसत आहेत.मुरबाड ग्रामीण रूग्णांलयात काही कोटीचा खर्च ठेकेदारीवर झाला परंन्तु रूग्णालयातील डॉक्टर आले नाहीत.योग्य उपौचार नाहीत कोव्हीड सेन्ंटर बंद झाले मात्र लोकप्रतिनिधीच्या समर्थकाची ठेकेदारी आणि अधिकार्‍याची टक्केवारीतच शासनाचा कोटी रूपये निधी हाडप केला त्याची चौकशी कोण करणार एकीकडे शिवसेना दुसरीकडे ठेकेदारीची भाजपा त्यामुळे मुरबाडचा भ्रष्टाचार उखडुन काढणारा अद्यापतरी कोणी वाली उरला नाही अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.मुरबाड ग्रामीण रूग्णालयाच्या आवारात सिमेंट काँक्रेट रस्ता तयार करण्यासाठी तात्कालीन कार्यकारी अभियंता दळवी यांनी इस्टीमेन्टला मंजुरी दिली असताना कोव्हीड सेन्टरच्या नावाखाली भाजपाच्या समर्थक ठेकेदाराना डांबरी करणाचा काम दिल्याचे समोर आले परंन्तू सदर कामाची वर्क ऑर्डर नाही मात्र रस्ता तयार करण्यास घेतला आहे अशीच कामे खासदार आमदार यांच्या समर्थकानी मुरबाड शहर व तालुक्यात केली आहेत त्यांना मुरबाड सार्वजनिक बांधकाम उपअभियंता कांबळे मुरबाड नगरपंचायतीचे कार्यकारी अधिकारी कंकाळ यांनी टक्केवारीनी मुरबाड शहर व तालुक्यात धुमाकुळ घातला आहे त्यांना लगाम घालण्यास महाविकास अघाडीच्या मंञ्याना अपयश आले आहे.पळू,सोनावळे,सिध्दगड,म्हसा,मुरबाड कोव्हीड सेंटर मुरबाड रेस्ट हाऊस मुरबाड शहरातील सर्वच रस्ते यांची कामे टेंडर काढण्या अगोदरच काढुन त्याची कामे थातुर मातुर बोगस करून नंतर इटेंडर काढुन इतर टेंडर भरणायाचे टेंडर रद्द केले आहे हा कारनामा लोकप्रतिनिधी यांनी सुरू केला आहे.अनेक कामे न करता बोगस बिले काढली आहेत अनेक रस्त्याच्या कामावर पुन्हा एका वर्षानी टेंडर काढले आहेत त्याची चौकशी करण्यास महाविकास अघाडी भाजपाला मुरबाड मध्ये का घाबरत आहे असा सवाल केला जात आहे.

No comments