web-ads-yml-728x90

Breaking News

राजधानी किल्ले रायगडवर नेत्रदीपक रोषणाई

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – रायगड

छत्रपती शिवरायांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त राजधानी किल्ले रायगडवर नेत्रदीपक रोषणाई करण्यात आलेली आहे. राज सदरसह रायगडवरील विविध वास्तू उजळल्या आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी किल्ले रायगडला भेट दिली होती. यावेळी किल्ल्यावरील महत्वपूर्ण वास्तू, छत्रपती शिवरायांची मूर्ती अंधारात असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी तातडीने त्यांनी पुरातत्व विभागाचे राजेंद्र यादव यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधला. रायगडावर विद्युत रोषणाईची व्यवस्था करण्यासाठी मागणी केली. मात्र, विद्युत रोषणाई करण्यासाठी आवश्यक फंड नसल्याचे यादव यांनी सांगितले. त्यावेळी श्रीकांत शिंदे यांनी जो काही ही फंड लागेल तो मी देतो, मात्र रायगडला अंधारात ठेवू नका अशा सूचना केल्या.तसेच छत्रपती शिवरायांची राजधानी किल्ले रायगडवरील राजसदर व होळीचा माळ येथील शिवरायांचा पुतळा आणि समाधी स्थळाला रोज पुष्पहार अर्पण करण्याचा संकल्प खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. संकल्प शिवजयंतीच्या माध्यमातून सुरू होईल.

No comments