web-ads-yml-728x90

Breaking News

‘ज्यांना गाव सोडून लढावे लागते, त्यांना काय उत्तर द्यायचे -चंद्रकांत पाटील

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – सांगली

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात अनेकदा शाब्दिक वाद होत असल्याचे दिसून येते. चंद्रकांत पाटलांची कोथरूड मतदारसंघातील आमदारकीची उमेदवारी टीकेचे कारण होत असल्याचे बऱ्याचदा दिसून आले. काल, शरद पवारांनी पाटलांवर टीका करताना पुन्हा एकदा याच मुद्द्यावर हात घातला. शरद पवार यांना काल माध्यमांनी चंद्रकांत पाटील यांनी पूजा चव्हाण प्रकरणी महाविकास आघाडीवर केलेल्या टीकेसंदर्भातील प्रश्न केला असता, ‘ज्यांना गाव सोडून लढावे लागते, त्यांना काय उत्तर द्यायचे,’ असा टोला लगावला होता. यावर चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत उत्तर दिलं आहे.

No comments